Breaking News

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी

आयुष्यात कष्ट करून मिळविलेले धन हे चिरकाल टिकणारे असते. त्याच कष्टाचे वर्षभरात चिज करून सर्वांचा सत्कार याच मायभूमीत होईल अशी खुनगाठ मनात बांधा. त्यासाठी मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे (ता.अकोले) येथे इयत्ता 1 ली व 12 वी बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या तसेच इतर स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा तसेच त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते काळू बेणके अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी मा. सरपंच गणपत डगळे, ग्राम पंचायत सदस्य पंढरीनाथ बेणके, आदिवासी विकास सोसायटीचे व्हा. चेअरमण प्रकाश पराड, कैलास आवारी, दगडू बेणके, दुंदा डगळे, अशोक आवारी, चिंधू साबळे, अशोक सुर्यवंशी, रामहारी आवारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बेणके पुढे म्हणाले की, शिक्षण हा पाया असून चांगले शिक्षण घेतले तर, जीवन सुजलाम सुफलाम होईल. यामध्ये शिक्षकांबरोबर पालकांची जबाबदारी महत्वाचे असल्याचे प्रतिपादन काळू बेणके यांनी केले. याप्रसंगी इ.10 वी बोर्ड परीक्षेतील कुंडलीक सुर्यवंशी प्रथम क्रमांक, दिपिका बेणके द्वितिय क्रमांक, ऋतीका भांगरे तृतीय क्रमांक तसेच, इ.12 वी तील कला शाखेतील लक्ष्मण जाधव प्रथम क्रमांक, मधुकर डगळे द्वितीय क्रमांक, शकुंतला भांगरे तृतीय क्रमांक व विज्ञान शाखेतील संकेत आवारी प्रथम क्रमांक, कांचन बेणके द्वितीय क्रमांक, प्रदिप बेणके तृतीय क्रमांक त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील कावेरी गोडे व प्रतिक्षा डगळे या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थीनींचा तसेच, स्कॉलरशिपमध्ये पात्र झालेला रोहित भांगरे आदी विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या आई व वडीलांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी विद्यार्थिनी कांचन बेणके व कुंडलिक सुर्यवंशी यांनी विद्यालया प्रती भावना व्यक्त केल्या. उपस्थित मान्यवरांपैकी कैलास आवारी, ज्येष्ठ शिक्षक शशिकांत कुलकर्णी, प्रा. रामदास डगळे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून प्रा. अंतुराम सावंत यांनी विद्यालयाच्या प्रगतीसाठी संस्था तसेच ग्रामस्थांचे मोलाचे योगदान असून, गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत भदाणे यांनी, तर प्रा. सचिन लगड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले