Breaking News

कृष्णकथेमुळे जीवन निश्चित सार्थकी : धर्माचार्य शेवाळे भागवतकथेची उत्साहात सांगता


कोल्हार प्रतिनिधी

वैकुंठात दुर्लभ असलेला काला हा मृत्यू लोकांतच मिळू शकतो. हा काला श्रीकृष्णाने गोकुळातच केला. कारण काल्याकरिता प्रेमरूपी सामग्री लागते, ती सामग्री गोपाळांच्या रूपाने परमात्म्याला प्राप्त झाली. श्रीमदभागवत कथेचे ज्ञान साक्षात श्रीकृष्णांच्या दरबारात {वृंदावनधाम} घेत आहोत. त्यामुळे येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक भाविकांचे जीवन निश्चित सार्थकी लागणार आहे, असे प्रतिपादन कथा प्रवक्ते धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे यांनी केले. 

माहीत महिन्यात {दि. २६ } पुणे ते श्रीक्षेत्र वृन्दावनधाम ( उत्तरप्रदेश ) या तीर्थयात्रेचे आयोजन ह. भ. प. अशोक महाराज इदगे यांनी केले होते. या यात्रेदरम्यान वृंदावनधाम येथे भगवान श्रीकृष्णाच्या दरबारात श्रीमद भागवत कथेचे निरूपन सप्ताह आयोजित करण्यात आला. या सप्ताहाच्या काल्याचे कीर्तन, आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन सप्ताहाची सांगता झाली झाली. त्यावेळी शेवाळे महाराज बोलत होते. याप्रसंगी यात्रेचे आयोजक भक्तीवैभव पुरस्कार विजेते अशोक महाराज इदगे यांचा ह. भ. प. श्रीकांत महाराज गागरे, महेश महाराज खाटेकर, शंकर महाराज शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.