Breaking News

जुगार खेळणाऱ्यांना रंगेहात पकडले


कोपरगाव शहर प्रतिनिधी

तालुक्यातील तिळवणी शिवारात एका हॉटेलच्या मागील जागेत विनोद प्रतापसिंग परदेशी {रा. तिळवणी} यांच्या शेतात जुगार खेळत असताना २३ जणांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख हजार ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे मनिष कल्वानिया व कोपरगाव तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

या कारवाईत इंडिका कार, मारुती सुझुकी, १२ मोटार सायकल, २० मोबाइल, ८२ हजार ५००/- रुपये रोख रक्कम असे एकूण ८ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे ईश्वर शंकर नागपुरे व विनोद प्रतापसिंग परदेशी रा. तिळवणी हे याच शिवारात विनापरवाना जुगार व देशी दारुचा अड्डा चालवत असताना छापा टाकण्यात आला. या छाप्यात रोख रक्कम ३ हजार ८९० रुपये, कल्याण मटका आकड्याचे पुस्तक, देशी दारूच्या बाटल्या, बियरच्या असा ५ हजार २७२ रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.