Breaking News

ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करा : भांड


राहुरी तालुका प्रतिनिधी

माणूस शिक्षण घेत असतांना थोड्या थोड्या गोष्टीचा बाऊ करुन ध्येयापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण जीवन हे समस्यांनीच भरलेले असते. पण त्या समस्यांना आपल्या ध्येयातील आडकाठी बनू न देता त्यावर मात करुन ध्येय्याच्या दिशेने मार्गक्रमन करा, असे आवाहन चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड यांनी केले.

देवळालीप्रवरा येथील चैतन्य कृषीविकास प्रतिष्ठानच्यावतीने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी भांड बोलत होते. कार्यक्रमास दत्तात्रय घोरपडे, कॉंग्रेसचे तालुकाउपाध्यक्ष राजेंद्र लोंढे, वैभव गिरमे, शिवचरित्रकार हसन सय्यद, पत्रकार रफिक शेख, गिताराम शेटे, शिवाजी घाडगे, राजेंद्र उंडे, मगन अंकुशे, पोपट शेटे, रवी घोरपडे आदी उपस्थित होते. 

प्रारंभी पत्रकार रफीक शेख यांनी प्रास्तविक केले. यावेळी कौस्तुभ ढूस, अक्षय साळुंके, वैभव जेजुरकर, प्रदीप पवार, शशिकांत कडू, प्रियंका पवार, ऋतिक कोकाटे, अर्चना कराळे, धीरज उगले, ऋतुजा आरंगळे, अर्थव सोनवणे, वैष्णवी वीर, कनकराज वरघुडे, शुभांगी जाधव, प्रगती वरघुडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चैतन्य कृषिविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कैलास सांगळे, निलेश कराळे, वैभव शेटे, बाळासाहेब सांगळे, सुभाष कांबळे प्रयत्नशील होते.