Breaking News

विधिमंडळ कामकाज अभ्यासण्यासाठी जर्मनीला भेट देणार - रामराजे नाईक-निंबाळकर

मुंबई, दि. 15, सप्टेंबर - जर्मनी आणि भारतातील संबंध सौहार्दपूर्ण व्हावेत तसेच जर्मनीतील विधिमंडळाच्या कामकाजाच्या स्वरुपाचा अभ्यास करण्यासाठी  विधिमंडळाचे शिष्टमंडळ लवकरच जर्मनीला भेट देणार आहे, असे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. जर्मनी देशाचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ.जुरगेन  मोरहार्ड यांनी सदिच्छा भेटी दरम्यान जर्मनी भेटीचे निमंत्रण दिले.
दोन्ही देशांतील औद्योगिक संबंध वाढविण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. जर्मनीतील स्टूटगार्ट शहर आणि राज्यातील सातारा शहर या शहरांना  सिस्टर सिटीचा दर्जा देण्याबाबत शक्यता पडताळून पाहावी, असे श्री.नाईक-निंबाळकर यांनी सुचविले. ग्रामीण पार्श्‍वभूमी असणार्‍या या दोन्ही शहरातील सांस्कृतिक  आणि सामाजिक साम्य त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. या दौर्‍यावर जाणार्‍या शिष्टमंडळामध्ये सभापती, अध्यक्ष, उपसभापती, संसदीय कार्य मंत्री व इतर प्रमुख  मान्यवरांचा समावेश असणार आहे. जर्मनीतील दूतावास, माध्यम प्रतिनिधी आणि जर्मनीतील भारतीय नागरिकांची यावेळी भेट घेण्यात येईल.