कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनाने उपराष्ट्रपती प्रभावीत
पुणे, दि. 23, जून - बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातील शेती संशोधनाने उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज प्रभावीत झाले. कृषी केंद्रातील विविध संशोधन आणि प्रायोगिक प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. नायडू यांनी आज माळेगाव (ता. बारामती) येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. यादरम्यान त्यांनी इंडो-डच सेंटर फॉर व्हेजिटेबल एक्सेलन्स, पशुजनुकीय सुधारणा केंद्र, कृ षी विज्ञान केंद्राची प्रशासकीय इमारत अशा विविध ठिकाणांची पाहणी केली. त्यांनी केंद्रातील प्रायोगिक प्लॉटवर जाऊन उत्पादन पाहिले. नायडू यांचे सकाळी पावणेदहाच्या सुमारास कृषी विज्ञान केंद्र येथे आगमन झाले.
नायडू यांनी प्रथम केंद्रातील ग्रीनहाऊसमधील सिमला मिरचीच्या प्लॉटला भेट दिली. केंद्राचे प्रमुख संशोधक सय्यद शाकीर अली यांनी त्यांना वाण, उत्पादकता व त्यातून मिळणारे उत्पन्न याबाबत माहिती दिली. इंडो-डच सेंटर फॉर व्हेजिटेबल एक्सेलन्सच्या माध्यमातून पिकविण्यात येणार्या विविध भाज्यांची उत्पादकता कशी वाढवता येईल, या तसेच त्याचा प्रसार केला जाण्यासाठी केंद्राक डून करण्यात येणार्या विविध उपाययोजनांची माहिती नायडू यांनी घेतली.
नायडू यांनी मधुमक्षिका पालन आणि पशुजनुकीय संशोधनाबाबत माहिती घेतली. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांनी संपूर्ण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रकल्पाच्या प्रतिकृतीची पाहणी केली.
त्यानंतर कृषी विज्ञान केंद्रातील सभागृहात राजेंद्र पवार यांनी नायडू यांचा शाल, बैलगाडीची प्रतिकृती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी नायडू यांनी कृषी विज्ञान केंद्राची प्रगती आणि वि विध संशोधन व प्रायोगिक प्रकल्पांवर आधारित माहितीपट पाहिला.