Breaking News

सोनईत पावसाची दमदार हजेरी


सोनई प्रतिनिधी

शहरासह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसभर गरम आणि दमट हवामान होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. दरम्यान, शेतकरी मात्र पावसाच्या प्रतिक्षेत असतांना आज ( दि. २३) दुपारी साडेचारच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झालया पावसामुळे काही ठिकाणी गटारी तुंबल्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाऊस झाल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले. परिसरात पानसवाडी, शिंगणापूर, हिंगोणी, कांगोणी, लांडेवाडी, शिरेगाव, बेल्हेकरवाडी आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसानंतर होणाऱ्या वापशानंतर बाजरी, मका आदी पिकांच्या पेरणीसह ऊस लागवडीला झपाट्याने वेग येणार आहे. या पावसामुळे बळीराजा मात्र चांगलाच सुखावला आहे.