Breaking News

राज्याच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाचा इशारा

चक्रीवादळ दक्षिण किनारपट्टीकडून केरळच्या किनारपट्टीकडे सरकण्याचे संकेत ; हवामान विभागाचा इशारा
मुंबई : महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीला चक्रीवादळाच्या तडाखा बसण्याची शक्यता शनिवारी भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. 


अरबी समुद्राच्या ईशान्येकडील भाग, गुजरातच्या उत्तर किनारपट्टी, मध्य-पूर्व अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीच्या वरच्या भागात चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. 
हवामान विभागाच्या अधिसुचनेत म्हटले आहे की, किनार्‍यापासून काही अंतरावरून जाणारे आणि समुद्र सपाटीपासून गुजरातच्या दक्षिण किनार्‍यापासून ते केरळच्या उत्तर किनार्‍यापर्यंत सरकणारे हे चक्रीवादळ आता राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडून केरळच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. अशा स्थितीमुळे एकाच दिवसात देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीवर तसेच, गुजरातच्या काही भागात जास्त प्रमाणात पर्जन्यवृष्टी किंवा अतिजास्त प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊ शकते. उत्तरेकडे सरकणारा मान्सून, किनाऱयाकडून समुद्राकडे जाणार्‍या सखल भागात पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण यामुळे पश्‍चिम किनारपट्टीव्यतिरिक्त प्रदेशात कमी पावसाची शक्यता आहे. मात्र, दुसऱया दिवशी दक्षिणी द्वीपकल्पीय प्रदेश लक्षणीय पर्जन्यमानाची शक्यताही या निवेदनात वर्तवली आहे. मागील आठवड्यात हवामानशास्त्र विभागाने उत्तर आणि दक्षिण कोकणासह दक्षिण गजरातमध्ये चक्रीवादळाची इशारा दिला होता. कोकण आणि गोवा राज्यात अतितीव्र ते तीव्र स्वरूपात पर्जन्यवृष्टीचा आणि गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकची किनारपट्टी, केरळ राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईवासियांनी जबरदस्त पावसाचा अनुभव घेतला. यामुळे अनेक ठिकाणी जलमय परिस्थिती आणि लोकल रेल्वे वाहतुक विस्कळित झाली होती. गुजरामध्येही काही भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.