संतांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला - संतोष महाराज पवार
शेवगाव प्रतिनिधी
सर्व जाती धर्मातील पंथातील संतांनी मानव कल्याण हाच केंद्रबिंदू मानून कार्य केले. मानव जातीतील भेदाभेद नष्ट करून समाजाला भगवत प्राप्तीचा मार्ग खुला करून दिला. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद संतांनी केला नाही. असे प्रतिपादन संतोष महाराज पवार यांनी केले.
शेवगाव नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगाव फाटा नजिक गुंफा येथील स्वयंभू काळेश्वर देवस्थानच्या मासिक सोमवार निमित्त आयोजित कीर्तन सेवेत महाराज बोलत होते. परमार्थापासून दूर गेलेल्या माणसाला सूख मिळत नाही, सर्वांचा निर्माता एकच आत्मा आहे, आत्म्याला जात धर्म पंथ असा कोणताही भेदभाव नाही, गुरु देवाच्या रुपाने आपल्यात समवेत आहे आत्मा कधीच भेदभाव करत नाही, प्रत्येकाने व्यवहारीक जीवन जगताना परमार्थ वाढीसाठी अग्रेसर राहिले पाहिजे असे मत महाराजांनी याप्रसंगी मांडले. याप्रसंगी महेश महाराज शेळके, कामधेनुचे चेअरमन बाळासाहेब काळे, शेतकरी बचावचे अध्यक्ष एकनाथ काळे, देवटाकळीचे अशोक मेरड, भाऊसाहेब महाराज शेकडे, अविनाश महाराज लोखंडे, शेषराव दुकळे, अनंता देशपांडे, बबन सौदागर, भाऊसाहेब सामृत, शंकर नारळकर, जालिंदर आहेर, सचिन काळे, सचिन फटांगडे, ज्येष्ठ पत्रकार आर. आर. माने, उस्मान सय्यद, देवदास वाघमारे, भाऊराव फटांगडे, जनार्धन लोढे, कांताभाऊ कमानदार, संजय आहेर, महादेव तापे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कामधेनु पतसंस्थेच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
