Breaking News

सातारा जिल्हा परिषदेच्या कोडोली शाळेस आयएसओ मानांकन

सातारा, 31 -  सातारा शहरानजीकच्या कोडोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस जागतिक आयएसओ मानांकन प्राप्त झाले. प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या हस्ते मुख्याध्यापक शशिकांत लोटेकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात सर्वात मोठी कोडोली येथे सातारा जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेत पहिली ते आठवीपर्यंत एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत जवळजवळ 28 ते 30 शिक्षक असून प्रत्येक वर्ग डिजीटल केले आहे. मोठ्या शाळेला आयएसओ मानांकन मिळण्याचा बहुमान कोडोली शाळेला मिळाला आहे. याप्रसंगी सरपंच वनिता खंडागळे, उपसरपंच मनोज गायकवाड, दिलीप पिसे, सदस्य, पालक शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या निवडीबद्दल शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, गट शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, पालकांनी अभिनंदन केले.