मराठा विद्या प्रसारक संस्थेने ग्रामीण भागातही गुणवंत विद्यार्थी घडवले - झावरे
शेवगाव शहरप्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेने ग्रामीण भागातही गुणवंत विद्यार्थी घडवले असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी केले . ते गुणवंत विद्यार्थी सोहळा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
रेसिडेन्शिअल हायस्कूल व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स शेवगाव येथे इयत्ता 10 वी व 12 वी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इ.10 वी व 12 वी, एन.एम.एस.एस व रोपस्किपींग मध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे यांनी गुणवंत विद्यार्थाचे कौतुक केले, तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाची पूर्वी पेक्षा आजची परिस्थिती चांगली आहे, या विद्यालयाचा भविष्य काळ उज्जवल आहे, हे विद्यालय ग्रामीण भागात असूनही शाळेचा निकाल उत्कृष्ट आहे. त्यासाठी विद्यालाचे प्राचार्य, सर्व शिक्षक वर्ग याचे मोलाचे योगदान आहे असे मत संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे , उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव मा. जी.डी. खानदेशे , सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, अॅड. वसंतराव कापरे , निर्मलाताई काटे , बापूसाहेब भोसले , फुलचंद रोकडे , माजी प्राचार्य पी.एस. काळे ,ंमा. प्राचार्य एकनाथ लवांडे , सर्जेराव निंबाळकर तसेच विद्यालयाचे प्राचार्य दिलीप फलके, उपप्राचार्या श्रीमती झुंबरबाई पाटेकर व विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी
उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बाळासाहेब गव्हाळ यांनी केले. तर आभार रामनाथ काळे यांनी मानले.