Breaking News

आ.शिवाजी कर्डिलेंच्या पत्नीविरुध्द मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल

 अहमदनगर । प्रतिनिधी । 31 - मुख्यमंत्री कोठ्यातून पहिली सदनीका मिळविली असतांनाही खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन दुसरी सदनिका मिळविल्याप्रकरणी भाजपचे आ. शिवाजी कर्डिले यांच्या पत्नी सौ.अलका शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात भादवि. 181,420 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी आ.कर्डिले यांचे तत्कालीन स्विय सहाय्यक अमोल जाधव यांचा खेरवाडी पोलिस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आला आहे. 
अमोल जाधव यांनी दिलेल्या जबाबात म्हटले की, सौ.अलका शिवाजीराव कर्डिले यांनी मुख्यमंत्री 5 टक्के कोठ्यातून सदनिका घेतांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी समक्ष म्हणून सही केली असल्याचे खेरवाडी पोलिसांनी कळविले. त्यानुसार चौकशीकामी पोलिसांनी बोलविल्यानुसार समक्ष हजर होऊन जबाब नोंदवत आहे. सौ. कर्डिले यांनी शासनाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नोटरी, अ‍ॅड.सुमतीलाल बलदोटा यांच्यासमोर नोंदविले. त्यावर समक्ष म्हणून सही केली. आ.शिवाजी कर्डिले यांच्या सांगण्यानुसारच मी सही केली असून त्यावर सौ. अलका कर्डिले यांनी माझ्या समक्ष सही केली आहे. यापुर्वी आ. कर्डिले यांनी शासनाच्या मुख्यमंत्री कोठ्यातून पुणे येथे सदनीका क्र.185 अ, रसेट सोसायटी, प्लॉट नं.06,येरवडा पुणे या शासनाकडुन मिळविलेल्या सदनीकेबाबत मला कोणतीही माहिती नाही. 
दरम्यान, खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन मुख्यमंत्री कोठ्यातून पहिली सदनीका असतांना दुसरी सदनीका पत्नीच्या नावे मिळविली. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोेपीस अटक झालीच पाहिजे. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे जाधव यांनी केली आहे.