Breaking News

येसगाव विद्यालयाचा शंभर टक्के निकाल


कोपरगाव ता. प्रतिनिधी: तालुक्यातील येसगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला. दिपज्योत दिलीप जपे हा विद्यार्थी ८९. २० टक्के मार्क मिळवून विद्यालयात प्रथम आला. विशाल सुनिल शिंदे- ८७.२० द्वितीय तर दामिनी अरविंद गायकवाड ८६.२७ टक्के गुण तृतीय क्रमांक मिळविला.

या विद्यालययातील विशेष प्राविण्यप्राप्त २७ विद्यार्थ्यांसह प्रथम श्रेणी मध्ये ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे आधारस्तंभ, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजीमंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे, आ. स्नेहलता कोल्हे, शाळेचे मुख्याध्यापक संजय नागपुरे, पर्यवेक्षक एस. एस. चांगले, स्थानिक स्कूल कमिटीसह शिक्षणप्रेमींनी अभिनंदन केले.