कृषीसमृद्धी केंद्रात चार गावांचा समावेश; १६ नवनगरांची होणार निर्मिती
शिर्डी/प्रतिनिधी : राहाता-कोपरगाव या दोन तालुक्यांच्या सीमेवरून जाणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्रात धोत्रे आणि वैजापूर तालुक्यातील पुरण, बापतरा, लाख, धोत्रे या गावांचा समावेश करण्यात आला आहे. हा मार्ग कोपरगाव तालुकातील १० गावांतून जात असून या महामार्गावरील १६ नवनगरे उभे राहणार आहेत.
धोत्रे, लाख. बापतरा, पुरणगाव येथील प्रकल्पास नगररचना विभाग यांची मंजुरी मिळाली आहे. ही शहरे जेव्हा उभी होतील, तेव्हा ती इतरांसाठी रोलमॉडेल ठेवणार आहेत. या गावातील ‘स्मार्टसिटी’साठी लॅंडपुलिंग योजनेत ५ हजार एकर जमीन संपादित होणार आहे. ७३% जमिनीची खरेदी झाली आहे.
शेतकऱ्यांनी एक एकर जमिनीच्या मोबदल्यात १ गुंठे भूखंड तसेच कोरडवाहू जमिनीस वर्षाला ३५ हजार हंगामी बागायतीला ४५हजार तर बागायतीला ६० हजार रु. नुकसान भरपाई मिळणार आहे. १० वर्षांपर्यंत कृषीसमृद्धी केंद्रामुळे या ग्रामीण भागाचा कायापालट होणार आहे. शेतीवर आधारित मोठे उद्योग सुरु होतील. त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा हा समृद्धी महामार्ग आहे.
