Breaking News

कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी : धर्माधिकारी


प्रवरानगर प्रतिनिधी : लोणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आय.टी. आय.) मध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अंतिम सत्राची परीक्षा देणाऱ्या तीनशेच्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अंतिम परिक्षा झाल्यानंतर उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करण्याची तयारी सहभागी कंपन्यांनी दर्शविली आहे, अशी माहिती प्राचार्य जयंत धर्माधिकारी यांनी दिली.

औरंगाबाद येथील एन.आर.बी. बेअरिंगने ९९, वाळुंज येथील ऋचा इंजिनिअरिंगने २२ तसेच पिंपरी-चिंचवड येथील बी.एस.ए. ट्रेनिंग अकॅडमी प्रा. लि. या कंपनीने १४१ आणि कोपरगाव येथील महिंद्रा ट्रक्टर्स शोरूमने ५१ विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. अंतिम परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या आस्थापनामध्ये समाविष्ट करून घेण्याची तयारी या सर्व कंपन्यांनी दर्शविली आहे.