Breaking News

गणेश ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल


राहाता प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या १२ वीच्या परिक्षेत येथील गणेश ज्युनिअर कॉलेज, को­हाळे या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. प्रियंका काळेकर ही विद्यार्थिनी भौतिकशास्त्र विषयात राज्यात प्रथम आली. या विद्यार्थिनीला ९४. ४६ टक्के गुण मिळाले. 

या महाविद्यालयातील आकांक्षा खालकर ९०. ४७ टक्के गुण मिळवून द्वितीय, श्रृती काळवाघे ८८. ८७ टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या महाविद्यालयातील गणित विषयात १०० पैकी ९० पेक्षा अधिक गुण मिळविणारे १५ विद्यार्थी तर भौतिकशास्त्रात १०, जीवशास्त्रात १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाविद्यालयाचे १९ विद्यार्थी ८० टक्क्यांच्या पुढे गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तर २७ विद्यार्थ्यांनी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्यावतीने संस्थेचे प्रमुख प्रा. विजय शेटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा कामिनी शेटे, विश्वस्त भारत शेटे, संदिप चौधरी, राहूल वल्टे, प्राचार्य रियाज शेख, रामनाथ पाचोरे, उपप्राचार्य प्रविण देहे, बापू पुणेकर, अभिजित कानगुडे, अनिल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.