आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांचे संकेत
मुंबई : लोकसभेच्या पालघर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघरप्रमाणे यापुढच्याही सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.दरम्यान, उद्धव ठाकरे युती तोडण्याची घोषणा क रतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण यावर त्यांनी बोलण्यास टाळले.
उद्धव ठाकरे म्हणाले, बहुमत मिळाल्यानंतर मित्रपक्षाची गरज लागत नाही. भाजपने पोट निवडणुकांमध्ये बहुमत गमावले आहे. पालघर लोकसभा शिवसेनेने लढवली होती. 2014 साली काही लाखांनी जिंकलेली जागा भाजपला आता काही हजारांनी जिकांवी लागली. बहुमतात असलेल्या भाजप सरकारला जनतेने 4 वर्षात नाकारले असल्याचा टोला ही उद्धव यांनी यावेळी लगावला. उत्तर प्रदेशमध्ये फुलपूर आणि गोरखपूरमध्ये तेथील जनतेने योगींची मस्ती उतरवली त्यांचे कौतुक वाटते. मात्र, शिवरायांचा अपमान क रणार्या योगींनी ज्याचा प्रचार केला तो निवडूण येतो. मग शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का? शिवरायांच्या अपमानावर भाजप का बोलत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. निवडणुक आयोग हा बागुलबुवा असून केवळ बुजगावणे असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. मतदान यंत्र बंद पडत असताना त्याची चौकशी करणे यांचे काम नाही का? मतदान यंत्रे उन्हामुळे बंद पडल्याची निर्लज्जासारखी कारणे दिली जातात. त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीयांनी तक्रार करायला हवी असे देखील ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.