संभाजी भिडेंच्या घटनाविरोधी विधानांविरूद्ध सरकार कारवाई करणार का?
धर्मनिरपेक्षता आपणास मान्य नसून मनुस्मृती ही मनुने दिलेली पहिलीच घटना असल्या संदर्भातील संभाजी भिडे यांचे वक्तव्य घटनाविरोधी असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची इच्छाशक्ती सरकार दाखवणार का? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.. संभाजी भिडे यांच्या सदरहू विधानाबाबत संताप व्यक्त करताना ना.विखे पाटील म्हणाले की,मनुस्मृती ही पहिलीच घटना असल्याचे वक्तव्य म्हणजे भारतीय राज्य घटनेचा अवमान आहे. एवढेच नव्हे तर धर्मनिरपेक्षता आपणास मान्य नसल्याचेही भिडेंनी म्हटले आहे. मात्र धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा आत्मा व लोकशाहीचा पाया आहे. यामुळे भिडे यांचे हे व्यक्तव्य देखील घटनाविरोधी आहे. भारतीय