Breaking News

साता-यासह जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस


साता-यासह जिल्ह्यात सायंकाळी साडे 5च्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधारपाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची चांगलीच पळापळ झाली.जिल्ह्यातील बहुतांश भागास वादळी वाजयासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वाजयामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तर रस्त्याकडेची झाडे, फांद्या पडल्याने अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत होती. सायंकाळी साडे 5च्या सुमारास अचानक काळे ढग जमा झाले. त्यानंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. शाळा काही दिवसांत सुरू होणार असल्याने बाजारपेठेत शालेय साहित्य विक्रीसाठी आले आहेत. पावसामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ते झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ उडाली.विजेचा लपंडाव..शहरातील सर्वच भागात रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. 
महाबळेश्‍वर व परिसरात सायंकाळी पावसा ची दमदार बॅटिंग 
महाबळेश्‍वर व परिसरात आज सायंकाळी पुन्हा एकदा पावसाने दमदार बॅटिंग केली.. सकाळ पासूनच शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते सायंकाळी सहा नंतर मुसळधार पाउसास सुरुवात झाल्याने स्थानिकांची चांगलीच धांदल उडाली तर पार्यटनास आलेल्या पर्यटकांनी बदलणार्‍या वातावरणाचा आनंद लुटला वेण्णालेक,बस स्थानक परिसर,बाजारपेठेत अनेक ठिकणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहावयास मिळले सायंकाळी पाऊसात देखील पर्यटकांनी मुख्य बाजारपेठेत खरेदीचा आनंद लुटला.प्रेक्षणीय स्थळांकडे गेलेल्या पर्यटकांना धुवाँधार पाऊसाने गाठल्याने पर्यटकांची चांगलीच धावपळ उडाली.