महाराष्ट्रातील सर्वात तरूण शहिद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या माता पिता प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माँ! तुझे सलाम देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन
दि. 3 एप्रिल 2018 रोजी महाराष्ट्राचा एक सुपुत्र, परभणी जिल्ह्यातील कोनेरीवाडी या पन्नास घरांच्या पाड्यावरचा तरूण शुभम सूर्यकांत मुस्तापुरे भारतमातेच्या रक्षणासाठी काश्मीरच्या कृष्णाघाटी येथे शहीद झाला. तो महाराष्ट्रतील शहिद झालेला सर्वात तरूण जवान आहे. वय अवघे 20 वर्ष.
ऐन तारुण्यात शुभमने देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. देशाच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणार्या शहिदांच्या कुटूंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन कुटुंबियांच्या पाठीशी उभे रहाणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाने शुभमचे माता-पिता यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माँ तुझे सलाम या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवार दिनांक 22 जून 2018 रोजी सायंकाळी 7 वा. रोटरी कम्युनिटी हॉल, गंजमाळ, नाशिक येथे संपन्न होणार्या या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाने केले आहे.