Breaking News

धनवानापेक्षा गुणवान उमेदवार निवडण्याची शिक्षक बांधवांना नामी संधी - अ‍ॅड. शिंदे

धुळे प्रतिनिधी
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न विधान परिषदेत मांडण्यासाठी धनवान उमेदवारापेक्षा गुणवान उमेदवार पाठविण्याची चागंली संधी शिक्षक बांधवांकडे चालून आली आहे. सर्वगुण संपन्न आणि समाज कार्याचा मोठा वारसा लाभलेले प्रा. संदीप बेडसे सारख्या गुणवान उमेदवार विधान परिषदेवर पाठवण्यासाठी 100 टक्के मतदान करून मताधिक्क्याने त्यांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या अस्तित्वाची लढाई म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शिंदे यांनी नाशिक येथे केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिक्षक भारती, समविचारी पक्ष आणि विविध शैक्षणिक संस्थासह शिक्षक संघटनांनी भरभरून पाठींबा दिलेले विधान परिषद नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अधिकृत उमदेवार प्रा. संदीप त्र्यंबकराव बेडसे यांच्या प्रचारार्थ आज रामलीला लॉन्स येथे रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हा मेळावा आयोजित होता. यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, बी. बी. मोकळ, भाऊसाहेब पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रा. संदीप बेडसे यांच्या वतीने पुनमताई बेडसे यांनी प्रास्ताविकेतून उपस्थित शिक्षक बंधू भगिनींना आपल्या अनमोल अशा मतदानातून सर्वगुणसंपन्न आणि प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव असलेला सर्वांंना सहज उपलब्ध होणारा उमेदवार निवडून देण्याची मी विनंती करीत आहे. प्रा. संदीप बेडसेंची उमेदवारी ही टी.डी.एफ सारख्या भव्य संघटन असलेल्या संघटनेने दिलेली आहे. तेव्हा आपल्या मताने चांगला उमेदवार आपण विधान परिषदेत पाठवून सेवेची संधी द्यावी, असे आवाहन केले. यावेळी बी. बी. मोकळ यांनीही संदीप बेडसे यांच्यासाठी सर्वांनी संघटितपणे मदत करावी. रयत शिक्षण संस्थेच्या या मेळाव्यातून मिळालेला संदेश सर्वांपर्यंत पोहोचवून अधिक मताधिक्याने उमेदवार निवडीचे भाग्य आपल्याला लाभले असे मनोगत व्यक्त केले. 
शिक्षक मेळाव्याला रयत शिक्षक संस्थेच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक शिक्षक संघटनेचे एस. बी. शिरसाठ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मेळावा घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन संजय पगार यांनी तर आभार योगेश गांगुर्डे यांनी व्यक्त केले.
उद्या दि. 22 रोजी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्यावतीने सचिव नीलिमा पवार यांनी आयोजित केलेल्या शिक्षक मेळाव्यात अध्यक्ष तुषार शेवाळे आदी पदाधिकारी प्रा. संदीप बेडसे यांना मतदान करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत, तरी शिक्षक बंधू आणि शिक्षिका भगिनींनी उपस्थित रहावे.