फुटीरतावादी नेता यासिन मलिकला अटक
श्रीनगर- फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असलेल्या मलिकला मेसुमा येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कोणत्या कारणाखाली मलिकवर कारवाई केली हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. ’रायजिंग काश्मीर’चे संपादक सुजात बुखारी यांची हत्या, काश्मीर नागरिकांच्या मृत्यूबद्दल फुटीरतावादी नेत्यांनी काश्मीर बंदची हाक दिली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मलिक याला अटक करण्यात आली आहे.