Breaking News

रोनाल्डोचा बॉडीगार्ड 'बुलफायटर'

मॉस्को

रशियामध्ये होणारी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आयसिससह इतर काही दहशतवादी संघटना या स्पर्धेदरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खेळांडूच्या सुरक्षेला महत्त्व देण्यात आले आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टीयानो रोनाल्डोने एका खास व्यक्तीला आपला बॉडीगार्ड नेमला आहे. विशेष म्हणजे हा बॉडीगार्ड बुलफायटर आहे. नुनो मारेकोस असे या बुलफायटरचे नाव आहे.

जीवघेणा खेळ म्हणून ‘बुल फाइट’ या खेळाकडे पाहिलं जातं. बुल फाइट व्यतिरिक्त नुनो मारेकोस मिक्सड मार्शल आर्ट्स (एमएमए) फायटरही आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स लिगच्या अंतिम सामन्या दरम्यानही मारेकोस रोनाल्डोसोबत दिसला होता. रोनाल्डोला स्वतःला बुलफाइट हा खेळ पाहायला अत्यंत आवडतो. त्यामुळे रोनाल्डोने मारेकोसची निवड करण्यापूर्वी त्याचा खेळ चांगला पाहिला होता. त्याची ताकद आणि साहस पाहिल्यानंतरच रोनाल्डोने मारेकोसची बॉडीगार्ड म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे.