Breaking News

शेतकरी मोर्चा विधानसभेवर धडकणार

मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने विधानभवनावर काढण्यात आलेला मोर्चा रविवारी मुंबापुरीत दाखल झाला आहे. या मोर्चाला भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी अनेक राजकीय पुढार्‍यांनी या मोर्चाला भेट देत त्यांना पाठिंबा दिला आहे. नाशिकहुन 6 मार्चला निघालेल्या या लाल वादळात आतापर्यंत नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे तसेच राज्याच्या अन्य भागातून तब्बल 35 ते 40 हजारांवर शेतकरी सहभागी झाले आहेत. हे मोर्चेकरी मजल-दरमजल करत अखेर रविवारी मुंबईमध्ये दाखल झाले असून सोमवारी विधानभवनावर धडक देऊन सरकारच्या उरात धडकी भरवणार आहे.


कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतक़र्‍यांच्या मुलांना शिक्षणात सवलती द्याव्यात, अशा मागण्या घेवून हजारोंच्या संख्येने एकवटलेला हा लाँग विधीमंडळावर धडकडणार आहे. शेतकरी विधान भवनाला घेराव घालणार असून, त्यामुळे सोमवारी मुंबईतील रस्ते जाम होणार आहेते. ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर जकात नाक्मयाच्या मोकळया जागेवर शनिवारी रात्री या सर्व शेतकऱयांनी विश्राम घेतला. शेकडो किलोमीटर पायी चालून आलेले हे शेतकरी मात्र थकले नव्हते. रात्री काही शेतक़र्‍यांनी झोप काढली, तर काही शेतक़र्‍यांनी ढोलकी, पिपाणीच्या तालावर ठेका धरला. पायात पैंजण बांधून या शेतक़र्‍यांनी पारंपरिक नृत्य सादर केले. तसेच क्रांतिगीते, पारंपरिक गीते गाऊन क्षणभर आपला सकाळपासून आलेला शीण घालवला. यावेळी अजित नवले म्हणाले, आमच्या आईला बापाला पिढयान पिढया यांनी लुटले आता हे चालणार नाही, आता त्याची मुल हुंकार फोडत आहेत. या हुंकारासाठी सरकारने सज्ज रहायला हवे. हा आमचा आक्रोश घेवून आम्ही विधीमंडळावर धडकणार आहोत. अशा शब्दात त्यांनी शेतक़र्‍यांच्या भावना व्यक्त केल्या.