Breaking News

म. फुले विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. धोंडे सेवानिवृत्त


राहुरी तालुका प्रतिनिधी -

येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषि विद्या विभागाचे प्रमुख तथा (प्रक्षेत्र संचालक) प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. मधुकर धोंडे हे दि. ३१ मे सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या बियाणे विभागाच्यावतीने निरोप देण्यात आला.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि विद्या विभागाचे प्रमुख तथा प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंकी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे बिजोत्पादन अधिकारी डॉ. चंद्रकांत साळुंके, डॉ. विजय शेलार, डॉ. केशव कदम उपस्थित होते.