Breaking News

नेमबाजी विश्वचषकमध्ये उदय, विजय 'वीर'


जर्मनी वृत्तसंस्था
उदयवीर आणि विजयवीर सिद्धु या भारतीय जुळ्या नेमबाजांनी जर्मनीत सुरु असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आपला सहकारी राजकंवर सिंह याच्यासोबत सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली आहे. २५ मी. पिस्तुल प्रकारात या जुळ्या भावांनी हे मोठे यश मिळवलं आहे. उदयवीरने सांघिक प्रकारासमावेत २५ मी. पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाचीही कमाई केली. दोन्ही भाऊ सध्या चंदीगढ येथील सरकारी कॉलेजमध्ये शिकत आहेत.“जर्मनीत आम्ही १७७४ गुणांची कमाई करत २४ वर्षांपासून युक्रेनच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे. अर्थातच हे सर्व सांघिक कामगिरीमुळे शक्य झालं आहे. उदयवीरने २५ मी. पिस्तुल वैयक्तीत प्रकारात आपला भाऊ विजयवीरला चौथ्या स्थानावर ढकलत ५८५ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. जर्मनीत उदयवीरला त्याचे प्रशिक्षक राजवीर यांनी बंदुकीची सोय करुन दिली तर विजयवीर त्याचा सहकारी अर्जुनसिंहची पिस्तुल वापरत ही कामगिरी केली.

दोन्ही मुलांनी देशासाठी सुवर्णपदक जिंकल्याचा मला अभिमान आहे.माझे पती गुरप्रीत सिंह यांनी २०१० साली दोन्ही मुलांसाठी नेमबाजीचा सराव घेण्यास सुरुवात केली. यावेळी भाड्याने आणलेल्या बंदुकीवर सराव करत होते. आपल्या मुलांना सरावासाठी हक्काची बंदूक असावी यासाठी गुरप्रीत यांनी १ लाख ३० हजाराचा खर्च करुन १० मी. पिस्तुल खरेदी केली.

- राणो सिद्धु(उदयवीर आणि विजयवीर यांची आई)