येणार्या काळात सर्वजण सामाजिक कार्य करू
ग्रामीण भागातील तरुणांनी सकारत्मक दृष्टीकोन ठेवून, जीवनाची वाटचाल केली पाहिजे, आज तरुणांनाच देश म्हणून भारताकडे पहिले जाते, तरुणांनी काही करण्याचे ठरविले तर, ते काहीही करू शकतात. केवळ राजकारणापुरते तरुणांनी आपली सीमा न ठेवता सामाजिक कार्यात पुढे यावे. युवक हा वेगळ्या मार्गाने चालला आहे. येणार्या काळात आपण सर्वजण एकत्रितपणे सामाजिक काम करू असे प्रतिपादन भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील मालेवाडी येथील डॉ. अक्षय खेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, स्त्री जन्माचे स्वागत शपथ प्रतिज्ञा व अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी पं.स.सदस्य किरण खेडकर, महारुद्र किर्तेने, अजिनाथ दराडे, कपिल खेडकर, अशोक बांगर, योगेश जवरे, अविनाश जवरे, कृष्णा जाधव, सुधीर फुंदे, विशाल जवरे, मयूर जवरे, पिराजी फुंदे, भाऊसाहेब बांगर, सोन्याबा बटुळे, संदीप अधुरे, मोहन दराडे, दिलीप जवरे, ज्ञानेश्वर धावड, निखिल खेडकर, संपत खेडकर, संदीप अधुरे आदींसह मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.