Breaking News

एसटी कर्मचा-यांचे निलंबन मागे घ्या मागणीसाठी सर्वपक्षीय एकवटले



शेवगाव प्रतिनिधी

राज्यव्यापी संपामध्ये शेवगाव बसस्थानकाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी आगार व्यवस्थापक देवराज यांनी पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे तो पाठविला. देवराज यांच्या या अहवालानुसार शेवगाव बसस्थानकाच्या पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम १४१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी मात्र सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. 

राज्य परिवहन महामंडळाचा नुकताच { दि. ०८} } राज्यव्यापी संप झाला. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी हा संप राज्यव्यापी केला गेला होता. या संपामध्ये राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी शांततेच्या मार्गाने सहभागी झाले होते. यामध्ये दिलीप जगन्नाथ लबडे, जाधव रावसाहेब मुरलीधर, वडते राजेंद्र भाऊराव, सरोदे राजेंद्र बाबुराव आणि पवार रावसाहेब गोविंद यांचा समावेश असून या सर्वांच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. 

दरम्यान, निलंबनाची ही कारवाई व्यक्ती द्वेषातून झालेली असून तीताबडतोब मागे घ्यावी, यासाठी शेवगावमधील विविध पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी शेवगाव बसव्यवस्थापक प्रमुख देवराज यांना निवेदन दिले. या कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शेगाव पंचायत समितीचे माजी सभापती अरुण लांडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांंडे, भारतीय टायगर फोर्सचे अध्यक्ष प्रा. किसन चव्‍हाण, नगरसेवक सागर फडके, नगरसेवक अजय भारस्कर, माजी सरपंच पिनू मगरे, विजय बोरुडे, माजी जि. प. सदस्य अशोक आहुजा, भाजपाचे बंडू रासणे, रवी सुरवसे, राज्य कौन्सिल सदस्य भाकप संजय नांगरे, शिवसेनेचे अविनाश मगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, दादासाहेब पाचरणे, कैलास तिजोरे, भाऊसाहेब लिंगे, चर्मकार संघाचे राजू तरटे, संजय गुजर आदी उपस्थित होते. दरम्यान, शेवगाव बस आगार व्यवस्थापक देवराज यांनी सदरचे निवेदन स्विकारून यावर लवकरात लवकर मार्ग काढू, असे आश्वासन शेवगावकरांना दिले.