Breaking News

नेवासा येथे दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट

नेवासा ( शहर प्रतिनिधी ) - नेवासा येथे दारूबंदीच्या २१ गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे . उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे यांचे आदेशाने नेवासा पोलीस स्टेशन येथील दारूबंदी गुन्ह्यातील १००० रूपये किमतीच्या आतील २१ गुन्ह्यातील किंमत रुपये १३१७६ जप्त मुद्देमाल साहयक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे तसेच मुद्देमाल कारकून पो .हे. कॉ. सुरेश शिंदे, जरे, गिते, साळवे,पवार , राजपूत तसेच दोन पंचासमक्ष तहसील आवाराचे बाजुला असलेले ठिकाणी खड्डा खोदुन सदर मुद्देमाल पंचासमक्ष नष्ट करण्यात आला.