Breaking News

नगरपंचायत हद्दीतील अंगणवाडीचे प्रलंबित प्रश्न सोडवू - मुख्याधिकारी शेख

नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा नगरपंचायत हद्दीत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी मुख्याधिकारी समीर शेख यांची भेट घेऊन अनेक समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी अंगणवाडीच्या समस्या व तेथील अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी समीर शेख यांनी बोलतांना दिली. यावेळी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या तालुकाध्यक्षा श्रीमती मन्नाबी शेख यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले . नेवासा नगरपंचायत अंतर्गत एकूण सव्वीस अंगणवाडया येत असून तेथील जागेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न ईतर समस्यांबाबत आपली भूमिका विषद केली. यावेळी बोलतांना मुख्याधिकारी समीर शेख म्हणाले की नगरपंचायतची निर्मिती झाल्यानंतर सर्व अंगणवाडया या नगरपंचायतच्या अखत्यारीत आल्या आहेत . जागेचा प्रश्न व ईतर सुविधा देण्यासंदर्भात नगरपंचायत मार्फत उपाययोजना करण्यात येईल . त्यासाठी गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुविधा देण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल . अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली. यावेळी अंगणवाडी सेविका हिराताई देशमुख आशाताई वाळुंजकर, सुषमा कडू , संध्या जाधव, माधुरी जामदार, मंगलताई घोडके-भाकरे, योगिता केंदळे, सुरेखा ढोकणे, अस्मा शेख, सविता पेचे, संध्या बडवे, अरुणा केंदळे, सुनिता यमे, अलका काकडे उपस्थित होत्या.