आजच्या तरुणांनी सकारात्मक दृष्टीने कार्यरत राहणे आवश्यक - प्रवीण डोंगरे
सोलापूर - देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच्या तरुणांनी सकारात्मक दृष्टीने कार्यरत राहणे आवश्यक आहे. तरुणांनी हुरळून न जाता आपल्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी व्यक्त केला. कर्णिकनगर सभागृहात दुर्गामाता नवरात्र महोत्सव मंडळ व आधार संघटनेच्या वतीने कुलकर्णी यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी डोंगरे बोलत होते. याप्रसंगी वाढदिवसावर होणार्या खर्चाला फाटा देत मंदार कुलकर्णी यांनी समाजोन्नतीसाठी झटणार्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 11 जणांचा गौरव केला.
