‘अमृतवाहिनी’च्या तंत्रनिकेतनची सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा
संगमनेर प्रतिनिधी : राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईच्यावतीने घेण्यात आलेल्या पदविका अभ्यासक्रमाचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने सर्वोेत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली, अशी माहिती प्राचार्य व्ही. बी. धुमाळ यांनी दिली.
राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे तांत्रिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षि स्व. भाऊसाहेब थोरात यांनी १९८३ साली अमृतवाहिनी तंत्रनिकेतनची स्थापना केली. संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि विश्वस्त आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त शरयु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने राज्यात लौकिक मिळविला आहे. यावर्षीच्या तृतीय वर्षाचा निकाल ८५ टक्के लागला. मॅकेनिकल विभागात स्मिता काळे ही ९३ टक्के गुण मिळवून तंत्रनिकेतमध्ये सर्वप्रथम आली. ऑटोमोबाईल विभागात मोईन अत्तार- ९० . १२ टक्के, इन्फॉरमेन्शन टेक्नॉलॉजी विभागात कावेरी थोरात - ८६. ६५ टक्के, कॉम्प्युटर टॅक्नॉलॉजी विभागात समर शेख- ८८. ६५ टक्के आदी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. याबद्दल संस्थेचे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
