Breaking News

भाजपच्या नेत्यांना मानसोपचाराची गरज : आनंद शर्मा

जोधपूर - काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी भाजपवर जबरदस्त हल्ला केला आहे. भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतरच भारताचा विकास झाला, असे भारतीय जनता पक्षाचे नेते समजत असतील, तर त्यांना मानसोपचाराची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शर्मा म्हणाले, भारत केवळ गेल्या चार वर्षांतच ‘मोठा देश’ झाला नाही. तर भाजप सत्तेत येण्यापूर्वीच तो एक आर्थिक शक्ती होता. ’गेल्या चार वर्षांमध्ये भारत एक मोठा देश बनला आहे, असे नाही. मोदीजी पंतप्रधान होण्यापूर्वीच भारताकडे आयआयटी आणि आयआयएमसारख्या संस्था होत्या. मात्र, जर ते म्हणत असतील, की त्यांच्यापूर्वी काहीही झालेले नाही, तर त्यांना मानसोपचाराची गरज आहे. मोदी सरकारला केंद्रात सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर शर्मा यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपचे नेते या चार वर्षांच्या काळात एडीएने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवत आहे.