Breaking News

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत साडेपाच हजार कामे पूर्ण

सोलापूर, दि. 27, जून - चालू 2017-18 या वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात 10 हजार 473 पैकी 5 हजार 657 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर 3 हजार 600 कामे प्रग तिपथावर आहेत. आराखड्यातील 1260 गावातील कामे अद्याप सुरूच झाली नाहीत. मागील वर्षाच्या आराखड्यातील कामे 20 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे शासन आदेश दिले आहेत. 2018-19 मधील जलयुक्त शिवार आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली. शासनाने कॅनाल कमांडमधील गावे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करू नये, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आराखड्यात पंढरपूर, माढा व माळशिरस तालुक्यातील कॅनाल कमांडमध्ये असलेली गावे वगळण्यात आली आहेत. मात्र त्या गावांमध्ये सिमेंट बंधारे बांधण्याबाबत शासनाची परवानगी मागितली आहे. यामुळे पंढरपूर, माळशिरस व माढा तालुक्यातील कॅनाल कमांडवरील गावे जलयुक्त शिवार योजनेतून वगळण्यात येणार आहेत. मागील वर्षीच्या आराखड्यामध्ये 3953 कामे पूर्ण झाली आहेत तर 1634 कामे प्रगतिपथावर आहेत.