Breaking News

सोलापूर-विजापूर महामार्गाच्या प्राथमिक कामांना सुरुवात

सोलापूर, 24 जून ( हिं. स.) सोलापूर-विजापूर महामार्गाच्या चौपदरीकरण कामास मंजुरी मिळाली आहे. या चौपदरीकरण कामाच्या प्राथमिक कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मंद्रूप येथे आणि केगाव येथील बाह्यवळण रस्त्यावर कामे सुरू झाली आहेत. सोलापूर-विजापूर या महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा मक्ता आयजेएम कंपनीस देण्यात आला आहे. चौदरीकरण कामाला सुरुवात करण्यापूर्वी या मार्गावरील झाडेझुडुपे, आजोरा, अतिक्रमण काढले जातात. या कामानंतर मार्किंग करून जागा निश्‍चित केली जाते. यानंतर प्रत्यक्षात रस्त्याच्या कामांना सुरुवात केली जाते. सध्या ही प्राथमिक कामे हाती घेण्यात आली आहेत. तेरा मैल ते सोलापूरकडे येणार्‍या रस्त्यावर तसेच केगाव पासून जाणार्‍या बायपास रस्त्यावर ही कामे गतीने केली जात आहे. केगाव ते हत्तूर हा 22 किलोमीटरचा बायपास रस्ता केला जात आहे. सोलापूर ते विजापूर हा 110 किलोमीटरचा महामार्ग चौपदरीकरण केला जात आहे. या 110 किलोमीटरच्या कामाअंतर्गत हा 22 कि लोमिटरचा बायपास रस्ता सुध्दा येतो. हत्तुर पासून पुढे 88 किलोमीटरपर्यंतच्या महामार्गचे काम होणार आहे. या 110 किलोमीटरच्या कामात 3 मोठे उड्डानपूल, 54 लहान पूल, 2 रेल्वे पूल, 4 भुयारी मार्ग आदी अनेक सुविधा होणार आहेत.