Breaking News

जीएसटी कार्यालयाला ’आयएसओ 9001 : 2015’ हे मानांकन

सोलापूर, दि. 27, जून - जीएसटी कार्यालयाला आयएसओ 9001 : 2015 हे मानांकन मिळाले. लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनासाठी हे गौरवशाली मानांकन असल्याचे राज्यकर सहआयुक्त नीलकंठ डाके यांनी सांगितले. या विभागांतर्गत असणार्‍या सहा कार्यालयांनाही हे मानांकन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम कार्यालयात झाला. उपायुक्त अभिजित ढाणे यांनी म्हणाले, सहआयुक्त उमाकांत बिराजदार यांनी सहा महिन्यांपूर्वी आयएसओची संकल्पना मांडली होती. त्याला डाके यांनी मूर्तस्वरूप दिले.या मानांकनासाठी पुण्याच्या ग्रेस कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसचे सहकार्य लाभले. जर्मनीच्या युनिव्हर्सल सर्टिफिकेशन सर्व्हिसेसच्या अधिकार्‍यांनी वेळोवेळी कार्यालयाला भेटी दिल्या. अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले. कार्यालयाची निरीक्षणे आ णि परीक्षणे नोंदवली. कार्यालय परिसर, दस्तावेजांची ठेवण, त्याचा निपटारा आणि लोकांच्या कामाशी बांधिलकी या गोष्टींबाबत कटाक्षाने लक्ष पुरवले.