‘प्रवरा गर्ल्स’चा निकाल १०० टक्के
प्रवरानगर प्रतिनिधी
लोणी येथील प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडियम स्कूलचा १२ वी परिक्षेचा निकाल १०० टक्के इतका लागला. विज्ञान शाखेतील स्वप्नाली वागस्कर या विद्यार्थिनीला ६५० पैकी ५०९ (७८. ३० टक्के ) गुण मिळाले असून ती शाळेत पहिली आली. पुनम बोराडे या विद्यार्थिनीला ७४. १५ टक्के गुण मिळवून ती दुसरी तर, ऋतुजा शेळके हिला ७२. ६९ टक्के गुण मिळवून तिसरी आली, अशी माहिती प्राचार्य संगीत देवकर यांनी दिली.
या विद्यार्थ्यांचे राज्याचे विरोधी पक्ष नेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर आदींनी अभिनंदन केले.