Breaking News

नेवासे तालुक्यात ९२.८५ टक्के शिक्षकांनी केले मतदान


नेवासा ( शहर प्रतिनिधी ) 
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत नेवासे तालुक्यात ९२.८५ टक्के शिक्षकांनी विधान परिषदेसाठी उत्स्फूर्त मतदान केले. विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी आज जिल्यात सर्वात जास्त मतदान नेवासे तालुक्यात झाले. नेवासा तालुक्यामध्ये जिल्ह्यात सर्वात जास्त पदवीधर मतदार नेवासा तालुक्यात आहेत. त्यासाठी २ बूथ जिल्हा परिषद मराठी शाळेत लावण्यात आले होते. त्यामध्ये एकूण १ हजार १०५ मतदारापैकी १ हजार २० मतदारांनी मतदान केले.
मतदान केंद्र केवळ नेवाशात असल्याने तालुक्यातील सर्व शिक्षक नेवाशात दाखल झाले होते. नेवासा केंद्राच्या बाहेर उमेदवार जास्त असल्याने जवळपास ८ पेंडल पडलेले होते. प्रामुख्याने आप्पासाहेब शिंदे, संतोष बेंडसे, शालिग्राम भिरूड, सुनील पंडित, नरेंद्र दराडे या उमेदवारांचे बूथ लावण्यात आले होते. सकाळी २ तासात केवळ ३१ जनांनी मतदान केले तर ११ वाजल्यानंतर मतदानाने वेग घेतला होता. १ वाजेपर्यंत सरासरी ४८ टक्के मतदान झाले होते. प्रत्येक मतदाराला पसंती क्रमांक लिहायचा असल्याने मतदान प्रक्रिया वेळकाढू होती. १६ मते देण्याचा अधिकार अनेक मान्यवरांनी वापरल्याने मतदानास विलंब होत होता. यावर्षी उमेदवारांची संख्या जास्त असल्याने मतदारांमध्ये देखील विविध गट दिसून येत होते. त्यात सर्वच राजकीय पक्षांनी वेगवेगळे उमेदवार पुरस्कृत केल्यामुळे मतदान केंद्रावर सेना, भाजप, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या तालुक्यातील नेत्यांनी हजेरी लावली. 
तहसीलदार उमेश पाटील व निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दोन्हीही मतदान केंद्रावर मिळून ८२४ पुरुष, १९६ महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्रात मोबाईल फोन घेऊन जाण्यास परवानगी नसल्याने मतदान केंद्रा बाहेरील उमेदवारांच्या प्रतिनिधी कडे मतदार मोबाईल फोन ठेवुन मतदानास जात होते .