प्रा. तुवर सेट परीक्षा उत्तीर्ण
सोनई प्रतिनिधी- खेडले परमानंद (ता.नेवासा ) येथील प्रा. ज्ञानेश्वर अर्जुन तुवर यांनी 28 जानेवारी 2018 ला झालेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) लाईफ सायन्स मधून विशेष प्रविण्यासह गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे . ते कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनईचे विज्ञान शाखेतील वनस्पती शास्त्र विभागातील प्राध्यापक आहेत. त्यांना मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे, उपप्राचार्य व वनस्पतीशास्राचे विभागप्रमुख डॉ. अशोक तुवर , डॉ. विठ्ठलराव दरंदले तसेच अहमदनगर कॉलेज अहमदनगर येथील उपप्राचार्य व वनस्पतीशास्राचे विभागप्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब गायकर, डॉ. अभिजित कुलकर्णी व प्राध्यापक या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.