मिरजेत दुचाकी चोरट्याकडून सात गाड्या हस्तगत
सांगली, दि. 01 - मिरज ग्रामीण पोलिसांनी रोहित बाबासाहेब धेंडे (18, रा. एरंडोली) या मोटारसायकल चोरट्यास अटक करुन त्याच्याकडून सव्वाचार लाख रुपये किमंतीच्या सात चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या. रोहित धेंडे यांचा साथीदार विशाल बाळासाहेब रुपनर फरारी आहे.पोलिस निरिक्षक राजू मोरे व पोलिस पथकाने तासगाव फाटा येथे नाकाबंदी तपासणीदरम्यान रोहित धेंडे याच्याकडे मोटारसायकलची कागदपत्रे नसल्याने संशयावरुन त्यास ताब्यात घेतले. धेंडे याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने मिरज, सांगली, आष्टा, कागवाड, नवी मुंबई येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. धेंडे याने चोरीच्या मोटारसायकली बेडग येथील हॉटेल चालकासह काही जणांना विक्री केल्याचे निष्पन्न झाले. काही मोटारसायकली त्याने बेवारस स्थितीत सोडून दिल्या होत्या. पोलिसांनी धेंडे याच्याकडून एका बुलेटसह सात चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.