ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मळीमिश्रित पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी
शेवगाव प्रतिनिधी दि 1 - ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा , ज्ञानेश्वरनगर या कारखान्याच्या आजूबाजूला वाहणार्या नाल्यामुळे कारखाना व्यवस्थापनाकडून मळीच्या पाण्याच्या नावाखाली हे मीठमिश्रित पाणी सोडले जाते ते पाणी जायकवाडीच्या जलाशयापर्यंत पोहोचते व शेवगाव पाथर्डी व अन्य ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईनद्वारे थेट सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचते या मळीमिश्रित पाण्यामुळे माणसासह जनावरांनाही पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. यामुळे व्यवस्थापन समितीने त्वरित मळीमिश्रित पाण्याचा कारखाना कार्यक्षेत्रावर बंदोबस्त करावा अन्यथा सत्यशोधक जनजागृती या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा हरिभाऊ दादा काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
शेवगाव नेवासा राजमार्गावरील भेंडा येथे संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे. या कारखान्यामार्फत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील अनेक ठिकाणावरून ऊस आणून त्याचे गाळप केली जाते. सदर कारखान्यातील मळीमिश्रित केमिकलचे पाणी कारखाना क्षेत्रावर त्याचा बंदोबस्त न करता हे पाणी नद्या व नाल्यामधून थेट जायकवाडीच्या जलाशयापर्यंत पोहोचते, या पाण्यामुळे नेवासा व शेवगाव या दोन्ही तालुक्यातील नदी-नाल्याच्या आसपासच्या क्षेत्रातील पिण्यायोग्य असणारे पाणी कायमस्वरूपी खराब होऊन गेले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील अनेक गावातील महिलांना दोन ते तीन किलोमिटीर अंतरावरून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. या मळीमिश्रित पाण्याविरुद्ध यापूर्वी अनेक शेतकर्यांनी अधिकारी वर्गाकडे आपले म्हणणे मांडले आहे . परंतु सदर शेतकर्यांना व स्वयंसेवी संस्थांना कारखाना व्यवस्थापन समिती यशस्वी होत आहे. त्यामुळे सदर पाणी बंद होता ओढ्या व नाल्यांमधून वाहत आहे, या पाण्यामुळे जायकवाडी जलाशयातील मासे मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर मरून पाण्यावरती तरंगले होते. असे यापूर्वी अनेक वेळा घडले आहे. सदरील नदीपात्रातील निसर्गसंपदा जळून गेली आहे . म्हणून या पाण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशीही मागणी प्रसिद्धीपत्रकात केली आहे. या प्रसिद्धी पत्रकाच्या प्रति महाराष्ट्र राज्य पर्यावरण महामंडळ मुंबई, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय नवी दिल्ली , भारत सरकार व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे पाठवल्या आहेत.