Breaking News

कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ

कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम बंद करण्याचा कृषी विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देवू, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी तंत्रनिकेतन संघर्ष समितीला दिली.. कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम बंद करण्याचा कृषी विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाबाबत राज्यात सर्वात प्रथम विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना सविस्तर पत्र पाठवून त्यांचे याकडे लक्ष वेधून या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर आणि कृषी विस्तार कार्यक्रमावर होणाऱ्या विपरीत परिणामाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते.