Breaking News

वृक्षरोपना बरोबरच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेणेही महत्वाचे

वृक्षरोपना बरोबरच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेणेही महत्वाचे असून निसर्गसंवर्धन आणि संगोपन हीच उत्तम अयोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन ब्रिलियंट बर्ड्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका सौ. धनश्रीताई विखे यांनी केले. राज्याचे विरोधीपक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वृक्षरोपण आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रमाचे उदघाटन सौ. धनश्रीताई विखेयांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या प्रारंभी प्राचार्य डॉ. यशवंत खर्डे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.प्रवरा मेडिकलट्रस्टचे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. के. बी लिंगे यांनी कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. महाविद्यालय परिसर आणि वसतिगृह परिसरात या वेळी वृक्षरोपन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. विजयकुमार राठी,प्रा. सतीश तुरकणे, प्रा. एम.डी. निर्मळ, प्रा. आर.एल निबे, प्रा. आर.बी. थेटे, प्रा.सिमा लव्हाटे, प्रा. स्वाती राऊत, प्रा. संजय गलांडे, प्रा. संजय जोंधळे, प्रा, विमल तनपुरे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. शिक्षक-शिकेतर सेवक आणि विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.