Breaking News

आ. थोरात यांनी केली आधुनिक बसस्थानाची पाहणी


संगमनेर प्रतिनिधी 
माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून संगमनेरात साकारत असलेल्या भव्य आणि हायटेक बसस्थानकातील नवीन मंदीरात श्रीदत्त महाराज मूर्तीची आ. थोरात यांच्या हस्ते मोठ्या भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा आणि व कलशारोहण करण्यात आले.

यावेळी रणजितसिंह देशमुख, जि. प. सदस्य रामहरी कातोरे, इंद्रजित थोरात, उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, किशोर पवार, विश्‍वासराव मुर्तडक, बी. आर. चकोर, जयवंतराव पवार, केशवराव मुर्तडक, निखील पापडेजा, नितीन अभंग, सत्यम वारे, शाम भडांगे, सतिष आहेर, सतिष खंडेलवाल, दिलीप पुंड, निखिल कातोरे, नवनाथ कातोरे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी आ. थोरात यांच्या संकल्पनेतून शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाची त्यांनी पाहणी केली.

प्रशस्त, आधुनिक, दर्जेदार आणि सर्वसोयीसुविधांयुक्त असे हायटेक बसस्थानक लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. तालुक्यासह इतर सर्व भागातून आलेल्या नागरिकांसाठी बसस्थानक हे महत्वाचे केंद्र आहे. नव्याने उभारलेले बसस्थानक हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये प्रवाशांसाठी सर्व सुविधा उभ्या करण्यात येणार आहे. या सर्व कामांची पाहणी माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

यावेळी अरुण गुंजाळ, शरद कोकणे, नवनाथ अरगडे, बाळासाहेब मोरे, किशोर टोकसे, राजाभाऊ क्षत्रिय, डॉ. भुतडा, निलेश जाजू, संतोष घुले, सुनिल कडलग, ओमप्रकाश जाजू, मंगेश मतकर, डेपो मॅनेजर सैंदाणे, बनकर, नंदू कानकाटे, डोंगरे, भगवान गीते, राजू पठाण, संतोष करवा, ह.भ.प इंगळे महाराज, संतोष महाराज, दयानंद गिरी महाराज आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.