शाळा महाविद्यालयांमध्ये जागतिक योगदिन साजरा
21 जून हा जागतिक योग दिन आहे. जामखेड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून योगासने व शारीरिक व्यायाम, कसरती घेवून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.
21 जून हा जागतिक योगदिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच, जामरवेड तालुक्यातही तो सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान जामखेड तालुक्यातील सर्व जि.प प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वतीने आपापल्या शाळेंमध्ये उपस्थिती दर्शविली. त्याचप्रमाणे सर्व शालेय स्टाफ व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाने सर्वच शाळा विद्यालय व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून योगासने व व्यायाम कसरती करवून घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे व्यायामाचे महत्व व फायदे या संबंधी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले. या जागतिक योगदिनाच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक शाळेेतील विद्यार्थ्याचे पालक, स्कूल कमीटी अध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.