Breaking News

फिफा फुटबॉल विश्वचषकानंतर मेसी घेणार निवृत्ती?




मॉस्को : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लायनेल मेसी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषकातून अर्जेंटिनाला बाहेरचा रस्ता धरावा लागल्यास मेसी तात्काळ निवृत्ती जाहीर करेल, असा दावा मेसीचा माजी सहकारी पाबलो झाब्लेटाने केला आहे.

क्रोएशियाने अर्जेंटिनाचा अनपेक्षित पराभव केला. या लाजिरवाण्या पराभवानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यातही संघाचा कर्णधार लायनेल मेसी टिकेचा धनी ठरत आहे. डिएगो मॅराडोनाप्रमाणे आपल्या देशाला विश्वचषक जिंकवून देण्याची ही मेसीकडे असलेली शेवटची संधी आहे असे बोलले जात आहे. मात्र सध्याची स्थिती पाहता एखादा चमत्कारच मेसीचे हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. सध्याची स्थिती पाहता अर्जेंटिना अव्वल १६ फेरीत पोहचण्याआधीच स्पर्धेबाहेर पडेल. संघ अशाप्रकारे स्पर्धेबाहेर फेकला गेल्यास मेसी तडकाफडकी निवृत्ती जाहीर करेल अशी शक्यता मेसीचा माजी सहकारी पाबलो झाब्लेटाने व्यक्त केली आहे.