सोशल मीडियातील अफवा रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान
मुले पळविणारे, दरोडा टाकणारी टोळी आल्याच्या अफवांनी दहशत
कुळधरण / प्रतिनिधी । 22 ः
गावामध्ये मुले पळविणारी तसेच दरोडा घालणारी टोळी आली आहे, अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियातून पसरवून जनतेमध्ये घबराट व भीती पसरवली जात आहे. या प्रकारांमुळे कित्येक ठिकाणी परप्रांतीय लोकांना विनाकारण मारहाण होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. या प्रकारामुळे समाजातील शांतता भंग पावत आहे. हे वाढते प्रकार पोलिसांची डोकेदुखी बनली असुन, या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्याचे आव्हान सध्या पोलिसांना पेलावे लागत आहे.
संपुर्ण जिल्ह्यात या प्रकाराला उधाण आले असुन, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ तसेच फोटो व्हायरल केले जात आहेत. या व्हिडिओत बहुतांश लोक हे परप्रांतीय असल्याचे दिसत आहे. त्यांनी नेमके कोणते कृत्य केले याबाबतची माहिती अनेक व्हिडिओतुन मिळत नाही. मात्र लोक समुहाने मारहाण करित असल्याचे दिसत आहे. पुरुष महिलांच्या वेषात फिरत असल्याचे दाखवून मारहाण झाल्याचेही निदर्शनास येत आहे. असे व्हिडिओ व्हॉटस्अप व अन्य माध्यमातून पसरवले जात असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले जात आहे. या अफवांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे.अहमदनगरचे पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सोशल मीडियातून आवाहन केले आहे. पोलिस विभागाकडून हे संदेश जनतेपर्यंत पोहोचविले जात आहेत. वस्तीवर येणारे अपरिचित लोक, साधुवेशातील लोक, किरकोळ विक्री करणारे फेरीवाले यांना विनाकारण मारहाण होण्याची शक्यता असल्याने अशा मारहाणीतून कोणी व्यक्ती जखमी अगर मृत्युमुखी पडल्यास अफवा पसरविणार्या इसमांवर कारवाही होवू शकते, असे कळविण्यात आले आहे. नागरिकांना अशा प्रकारच्या अफवा पसरवू नये, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणी अशा अफवा पसरवित असल्यास सायबर पोलीस ठाणे फोन नंबर 0241 -2323121, नियंत्रण कक्ष 0241-2416138 किंवा आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.