सोलापूर, दि. 10, जून - भिवंडीहून साहित्य घेऊन हैदराबादकडे जाताना कंटेनर चालकानेच ट्रकमधील साडेसहा लाखांचे साहित्य काढून घेतल्याचे समोर आले आहे. ट्रान्सपोर्ट चालक दादाभाऊ झंझाड (पुणे) यांनी जोडभावी पोलिसात तक्रार दिली आहे. कंटेनरचालक भाईसाहेब पवळ (बीड) याच्यावर गुन्हा दाखल झाला. पवळ हा हैैदराबादकडे साहित्य घेऊन जात होता. उमरग्याजवळ गेल्यानंतर पवळ याने झंझाड यांना साहित्य चोरीस गेल्याची माहिती दिली. तेही सोलापुरात आले. तपासणी केल्यानंतर कंटेनरमधील काही बॉक्समधील साहित्य गायब होते. जीपीएसने कंटेनरचा माग काढल्यानंतर कंटेनर सोलापूर यार्डसमोर 20 मिनिटे थांबला होता. संशयावरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कंटेनर चालकानेच पळवले साडेसहा लाखांचे साहित्य
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:59
Rating: 5