Breaking News

उजनी उजवा कालव्याचे पाणी बंद

सोलापूर, दि. 10, जून - उजनी उजवा कालव्याचे पाणी बंद करण्यात आलेले आहे. तसेच सध्या मुख्य कालव्यामधून डाव्या कालव्यास 900 क्युसेस विसर्ग सुरू आहे. तर बोगद्याला सोडलेले पाणी धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे आपोआपच कमी होऊ लागले आहे. बोगद्याचा विसर्ग 150 क्युसेस वरती आलेला आहे. उजनी धरणामधून एकूण 3 हजार 50 क्युसेस विसर्ग सोडला जात होता.उजनी धरणातील पाणीसाठा दिवसें दिवस चिंताजनक होत चाललेला आहे. 30 मे रोजी वजा 4.86 टक्के असलेले उजनी धरण 8 जून रोजी वजा 18.65 टक्यांवरती गेलेले आहे. उजनी धरणामधून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग कमी करण्यात आला आहेत. सध्या हा विसर्ग 2 हजार क्युसेस करण्यात आलेला आहे. याचबरोबर पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी उपयुक्त पाणीसाठा आहे. यामुळे उजनीच्या वरच्या बाजूला असलेली धरणे या वर्षी लवकर भरतील व उजनीत पाणी येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.