अमरनाथ यात्रेकरूंना पावसाचा फटका
बलताल : मुसळधार पावसाचा फटका अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांच्या पहिल्या टप्प्याला बसला आहे. मुसळधार पावसामुळे आज बलताल येथे या भाविकांनी मुक्काम ठोकला. ’हे भाविका बलताल येथील लष्करी तळावर राहत असून हवामान स्वच्छ होईपर्यंत हा तळ हलवला जाणार नाही. यासाठी आम्ही नियमित भारतीय हवामान विभागाच्या संपर्कात असल्याचे गंदेरबालचे उपायुक्त डॉ. पियुष सिंघला यांनी सांगितले. हवामानातील या बदलामुळे आम्ही यात्रेकरूंना पुढे पाठवू शकत नाही. बलतालपासून 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता पावसामुळे निसरडा झाला असल्यामुळे तो सध्या असुरक्षित आहे. आमचे या सर्व परिस्थितीवर लक्षपूर्वक निरीक्षण आहे. त्यामुळे आम्हीही पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.